मेक्सिकोमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते एका ट्रकमध्ये आले आणि त्यांनी बारमध्ये घुसून गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर ते तेथून पळून गेले. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. बारमध्ये अनेक लोक उपस्थित असताना ही घटना घडली.