शेती व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे – डॉक्टर दिलीप अलोणे !
शेती व्यवसायाचा भरमसाठ खर्च लक्षात घेता फायद्याची शेती करायची असेल तर शेतीला नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे असल्याचे मत पाटण येथील प्रयोगशील शेतकरी शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोणे यांनी व्यक्त केले.
पाटण येथील शेतीत कपाशीवरील फवारणीसाठी ड्रोन चा वापर कसा फायदेशीर आहे याच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना डॉक्टर अलोणे मार्गदर्शन करीत होते. यावेळी झरी पंचायत समितीचे मंडल कृषी अधिकारी गजानन इंगोले, कृषी पर्यवेक्षक नामदेव किनाके, कृषी सहाय्यक राजू कुडमेथे, ड्रोन चालक नितेश धुळे व शेतकरी उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना आज ड्रोन फवारणीची कशी गरज आहे हे समजावून सांगत असताना त्यामुळे मजुरी कीटकनाशक याची कशी बचत होते हे विस्ताराने समजावून सांगितले.
शेती अधिक किफायतशीर होण्यासाठी नॅनो सारखे नवे तंत्रज्ञान विकसित होत असून आधुनिक यंत्र निर्मितीही होत आहे. पारंपारिक पद्धतीला चिकटून न राहता नव्या तंत्रज्ञानाची जर सांगड घालता आली तर शेती अधिक सुलभ व फायदेशीर ठरू शकते. याचे अतिशय उपयुक्त मार्गदर्शन डॉक्टर अलोने यांनी यावेळी केले. आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करीत असतात
जीवन रेड्डी यंगुवार यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणीची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.