Homeशिक्षण-प्रशिक्षणशाळेच्या धोकादायक इमारतीच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण

शाळेच्या धोकादायक इमारतीच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण

शाळेच्या धोकादायक इमारतीच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण

महागाव – मंचक गोरे महागाव पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद सवना येथील केंद्रीय प्राथमिक मुलं व मुलीच्या शाळेची अवस्था अत्यंत वाईट झाली असून या ठिकाणी कुठलाच अधिकारी किंवा पदाधिकारी लक्ष घालण्यासाठी तयार नसल्याने अखेर विद्यार्थ्यांना इमारतीच्या बाहेर पटांगणामध्ये उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे.शाळेची इमारत धोकादायक असल्याची बातमी प्रकाशित होऊन सुद्धा प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही काम हाती घेतलेली दिसत नाही. त्यामुळे प्रशासन विद्यार्थ्यांचा जीव घेतो की काय असा पालकांना विचार पडलेला आहे.प्राथमिक शाळेत अत्यंत गोरगरीब मजुर वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेतात आणि श्रीमंताची मुलं हे इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेतात. श्रीमंतांची मुले इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असल्याकारणाने जिल्हा परिषद शाळा कडे एकाही पदाधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने भेगा पडलेल्या इमारतीमध्ये गरिबांच्या मुलांना जीव मुठीच घेऊन शिक्षण घेण्याची वेळ सवना येथील केंद्रीय शाळेमध्ये आलेली दिसत आहे .अखेर शिक्षकांवर ही जबाबदारी असल्याकारणाने विद्यार्थ्यांना पटांगणात उन्हात च शिक्षणाचे धडे देण्याचे काम शिक्षकांनी हाती घेतलेले दिसत आहे. प्रशासनाला अनेक वेळा मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने कागदपत्रांचा पाठपुरावा केला पण त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची वेळ आलेली आहे. चालू शैक्षणिक सत्रात होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरसोईकडे आता तरी शिक्षण विभाग लक्ष घालेल का ? अन्यथा पालकांना आपल्या पाल्यांची शाळा बंद करण्याची वेळ आलेली दिसत आहे.या शाळेकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष नसल्याकारणाने येथील कर्मचारी आपापल्या मनाने ५० कि.मी ये – जा करतात वेळेनुसार या ठिकाणी कर्मचारी येत नाही.एकही कर्मचारी या ठिकाणी मुख्यालय राहात नसल्याचे अनेक पालकातून बोलल्या जाते. त्यामुळे जिल्हा परिषद सवना येथील विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येत नसल्याने ‘ढ’विद्यार्थ्यांची संख्यात वाढ होताना दिसत आहे .त्यामुळे शिक्षण विभागाने सवना जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कडे तातडीने लक्ष घालावे अशी जनतेची मागणी आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंबई इंडियन्स वि दिल्ली कॅपिटल लाइव्ह स्कोअर, आयपीएल 2025: डीसीचे 16.50 कोटी रुपये स्टार...

दिल्ली कॅपिटल (इलेव्हन खेळत आहे): फाफ डु प्लेसिस (सी), अबिशेक पोरेल (डब्ल्यू), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्ब्स, दुश्मण्था चमेरा, विप्रज निगम, माधव तिवारी,...

कोल्ड कॉफीसाठी नारळाचे दूध एक परिपूर्ण दुग्ध-मुक्त पर्याय का आहे

तापमान वाढत असताना, या हंगाम-शीत कॉफीच्या स्टार ड्रिंकवर आमचे प्रेम केवळ अनोळखी व्यक्ती वाढते. कॉफीचा थंडगार आणि क्रीमयुक्त ग्लास जेव्हा सूर्य सेट करण्यास सुरवात...

error: Content is protected !!