लोणी देवगाव शेत शिवारात एका इसमाची विष प्राशन करून आत्महत्या
आर्णी गणेश एकंडवार
आर्णी तालुक्यातील लोणी- देवगाव शेतशिवारात गावाच्या समोर देवगाव रोडवर एका 60 वर्षीय इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी चार वाजता दरम्यान घडली आहे. संजय मानसिंग पवार वय 60 वर्ष राहणार माळहिवरा हल्ली मुक्काम देवगाव मृतक व्यक्ती हा एक वर्षापासून देवगाव येथे राहत होता. रोज मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवीत होता. वाढत्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली सदर घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळतात बीट जमादार अरुण चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळ घाटून पंचनामा केला. व शवविच्छेदन करिता पाठविले आहे. तसेच पुढील तपास आर्णी पोलीस करीत आहे.