रेती चोरुन पळणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात
रेती चोरुन पळणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात.
महागांव, ता. १३ : तालुक्यात सर्वच रेती घाटांवर महसुल व पोलिस यंत्रणेच्या मूक संमतीने रेतीचा उपसा सुरू आहे. राजरोसपणे रेतीची चोरी केली जात आहे. महागांव तालुक्यातील महागांव येथिल पुस नदीवरील रेती घाटावर दिवसाला ५० वाहने रेतीचा उपसा करीत असतात. याच स्पर्धेतून भरधाव ट्रॅक्टरला रविवारी सकाळी ९ वाजता
नागपूर तुळजापूर महामार्गावरील दिवसा चोरीची रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर अंबोडा आणि खडका नदीवरील पुलाजवळ हनुमान मंदिराच्या बाजूला वाळूचे ट्रॅक्टर पलटी झाला. यात चालक व एकजण गंभीर जखमी आहे. महागांव येथील पुस नदी पात्रातून
रेतीचा उपसा केला जात आहे. सकाळीच रेतीची खेप
घेऊन जात असणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर वरील चालकाचे
नियंत्रण सुटले. हा अपघात झाला आहे. स्थानिक महसुल व पोलिस यंत्रणांनी रेती घाटावर उपसा करण्याची मूक संमती
दिली आहे. त्याकरिता प्रतिवाहन महिन्याला हप्ता पोहोचविला जात आहे. एकीकडे प्रशासनाने नियमावर बोट ठेवून रेती घाटाचा
लिलाव थांबविला. नवीन रेती डेपो ही उघडले नाही. सर्वसामान्य नागरिक जादा दराने तस्करांकडून रेती खरेदी करण्यास मजबूर झाले आहे. हा पैसा यंत्रणेला गब्बर बनवित आहे. अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही.
….चौकट…
रेती तस्कर एवढे शिरजोर का झालेत !
नियमानुसार प्रशासनाकडे घर बांधण्यासाठी रेती मागणाऱ्यांना रेती मिळाली नाही. पर्यावरण विभागाचा कायदा दाखवत रिकाम्या हाताने परत पाठविले. दुसरीकडे मात्र रेती तस्कर रेती घाटातून राजरोसपणे उपसा करीत आहे. या तस्करांना एवढे अभय कुणाकडून मिळत आहे. ते शिरजोर का झालेत असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहे .