यवतमाळ आयटीआय येथे भरती मेळाव्याचे आयोजन
यवतमाळ, दि. 17 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे दि.23 ऑक्टोंबर रोजी हिन्दुस्थान एरोनॉटीक्स लिमीटेड, नाशिक या नामांकित कंपनीचा अॅप्रेटीस भरती मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हिन्दुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड, नाशिक ही आस्थापना केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत असून भारतीय नवरत्न कंपनीचा दर्जा प्राप्त आहे. या आस्थापनेमध्ये लाईट कॉम्बॅक्ट हेलीकॉप्टर तयार केले जात असून लढाऊ विमानांची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातात. या आस्थापनेमध्ये आयटीआय करीता २३ जागा उपलब्ध असून यामध्ये फिटर, ईलेक्ट्रीशियन, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, कोपा या व्यवसायातील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना संधी उपलब्ध आहेत.एचएएल या आस्थापनेमध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरींग करीता ४ जागा व बॅचलर ऑफ इंजिनिअरींग करीता ५ जागा अॅप्रेटीसकरीता उपलब्ध आहेत. पात्र उमेदवारांनी दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता संस्थेतील वर्कशॉप क्रमांक २ मध्ये उपस्थित राहावे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी कळविले आहे.
—