Homeताज्या बातम्याभटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता

भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता

भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता

यवतमाळ, दि. 8  : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने भटक्या जमाती क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रिबाई फुले आधार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अर्ज करण्यास दि.11 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शासनाने मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतनमध्ये शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी निवासी व शिक्षण सुविधेपासून वंचित राहू नये, यासाठी शासन निर्णयान्वये आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र वसतिगृह निर्वाह भत्ता योजना लागू करण्यात आली आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत अर्ज स्विकृतीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाकरिता अर्ज स्विकारण्याची शेवटची दि.11 नोव्हेंबर व निवड यादी जाहीर करण्याचा दिनांक 15 नोव्हेंबर असून उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षाकरिता अर्ज स्विकारण्याची शेवटची दि. 11 नोव्हेंबर व निवड यादी जाहीर करण्याचा दि.15 नोव्हेंबर आहे. या योजनेचे विहीत कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक ओमप्रकाश नगराळे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीसीएस आजची बैठक आज थेट अद्यतनेः सीसीएसच्या बैठकीपासून उत्तराखंड आणि ओडिशामधील तिरंगा प्रवास, देश...

सीसीएस बैठक आज थेट अद्यतनेः आज आयोजित केलेल्या सीसीएस बैठकीत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सुरक्षा ऑपरेशन्सचा आढावा घेण्यात येईल. या बैठकीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित...

क्रिकेट दक्षिण आफ्रिका आयपीएल 2026 विस्तारावर कठोर भूमिका घेत असल्याने बीसीसीआयला धक्का बसला

इंडो-पाक संघर्षामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 हंगामाच्या विस्तारामुळे फ्रँचायझींसाठी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी झाली आहे. भारतातील क्रिकेटच्या नियंत्रण मंडळाचा संदेश (बीसीसीआय) सर्व परदेशी खेळाडूंना...

व्हायरल माजी बॉयफ्रेंड टोस्ट म्हणजे काय? नात्यापेक्षा जास्त काळ टिकणारी एक कृती

अन्नाच्या ट्रेंडमागील मूळ कथा नेहमीच आकर्षक असतात. प्रत्येक व्हायरल डिशमध्ये बॅकस्टोरी असते आणि कधीकधी ती रेसिपीपेक्षा अधिक मनोरंजक असते. ऑनलाइन लोकप्रियता मिळविणारी अशी एक...

error: Content is protected !!