Homeसामाजिकपालकमंत्र्यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

पालकमंत्र्यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

पालकमंत्र्यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण

समाजातील सर्वच घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न – संजय राठोड

यवतमाळ, दि.14 पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, बांधकामे, भक्त निवास, डिजिटल क्लासरुम, मोकळ्या जागेचे सौदर्यीकरण अशा कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आज झाले. समाजातील सर्वच घटकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांसह माजी जिप सभापती श्रीधर मोहोड, दारव्हा नपचे मुख्याधिकारी विठ्ठल केदारे उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आलेल्या निंभी ते पिंपरी मार्गाचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले. दारव्हा शहरातील नगर परिषद प्राथमिक शाळा दोनच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम, नगर परिषद मराठी शाळा दोनमध्ये डिजिटल क्लासरूम तसेच इंटेरीयल वर्क, प्रभाग क्रमांक दहा मधील मोकळ्या जागेचे सौदर्यीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले. टिळकवाडी ते दिग्रस रोडपर्यंतचे बांधकाम, चावडी हद्दीमध्ये व्यापारी संकूल बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

दारव्हा तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव येथील जुनी मुख्य ईमारत निर्लेखन करुन त्याच जागेवर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य ईमारत बांधकाम व अधिकारी, कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे लोकार्पण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत प्रमुख जिल्हा मार्ग माहुली ते इरथळ रस्ता भूमिपूजन करण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र मांगकिन्ही येथील जुनी मुख्य ईमारत निर्लेखन करुन त्याच जागेवर नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन, जिल्हा परिषद प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळा बांधकाम भूमिपूजन, मांगकिन्ही, वरझडी सीमा येथील ग्रामीण मार्ग ५८ जोडण्याकरीता लहान पुलाचे बांधकामाचे लोकार्पण, मांगकिन्ही, तेलगव्हाण, करजगाव प्रमुख जिल्हा मार्ग ८३, इतर जिल्हा मार्ग १२ रस्त्याचे सुधारणा कामाचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले.

जगदंबा माता प्रतिष्ठाण डोल्हारी देवी येथे भक्त निवासाचे बांधकाम, संरक्षण भिंतीचे बांधकाम व सौंदर्याकरण, स्वयंपाकगृह व भोजनगृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जवळा, ब्रम्हनाथ, कुऱ्हाड, नांदगव्हाण, राजीवनगर ते राज्य मार्ग २९३ रस्ता, इतर जिल्हा मार्ग १३ या रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते आज करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या साध्या आयुर्वेदिक पाचक मिक्ससह नैसर्गिकरित्या आंबटपणा कसा बरे करावा

आजच्या वेगवान-वेगवान जगात, आपली पाचक प्रणाली बर्‍याचदा आपल्या जीवनशैलीच्या निवडींचा, शांतपणे परंतु व्यक्तीचा त्रास सहन करते. बॅक-टू-बॅक मीटिंग्ज, वगळलेले ब्रेकफास्ट, रात्री उशिरा स्नॅकिंग आणि...

एलएसजी स्टार डिजीवे रठी वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बीसीसीआयने निलंबित केले

अ‍ॅनिमेटेड चॅटमध्ये अभिषेक शर्मा आणि डिगेश रिती© बीसीसीआय/स्पोर्टझपिक लीगच्या वारंवार उल्लंघनासाठी लखनऊ सुपर गियाट्स स्पिनर डिग्व्ह रिती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलने एक...

Apple पल गंभीर सुरक्षा दोषांच्या निराकरणासह आयपॅडसाठी आयपॅडो 17.7.8 अद्यतनित करते

Apple पलने सोमवारी आयपॅडो 17.7.8 आयपॅडसाठी अद्यतनित केले. हे काही दिवसांपूर्वी सादर केले गेले होते परंतु आयपॅडो 17.7.7 फर्मवेअरचा पाठपुरावा म्हणून आला आहे परंतु...

error: Content is protected !!