Homeताज्या बातम्यानिवडणुकीत काळ्या पैशाचा वापर होत असल्यास माहिती द्या

निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर होत असल्यास माहिती द्या

  • निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर होत असल्यास माहिती द्या

आयकर विभागाचे नागरिकांना आवाहन

यवतमाळ,दि.17  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची नुकतीच घोषणा झाली आहे. ही निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासोबतच यादरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तीकर विभागाने टोल फ्री तसेच व्हॅाट्सअॅप क्रमांकासह ई-मेल पत्ता जारी केला असून अशा पैशाचा वापर होत असल्सास त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पडाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागही तयार असून दरम्यानच्या कालावधीत काळ्या पैशांच्या व्यवहारावर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल आदी संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी थेट आयकर विभागाशी संपर्क साधावा. संबंधित माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख ही गुप्त ठेवण्यात येणार आहे.नागरिकांनी माहिती देण्यासाठी 1800-233-0355 किंवा 1800-233-0356 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. एखाद्या घटनेची छायाचित्रे, व्हिडिओ ईत्यादी माहिती 94033 90980 हा व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावीत. सदर मजकूर nagpur.addldit.inv@incometax.gov.in किंवा nashik.addldit.inv@incometax.gov.in या मेल आयडीवर मेलही करता येईल, असे आयकर विभागाचे नागपूर येथील उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंड वि इंग्लंडच्या कसोटी पथकासाठी सरफराज खानने झेप घेतली. अजित आगरकर म्हणतो, “त्याला १००...

इंग्लंडच्या आगामी पाच सामन्यांसाठी शुबमन गिल यांना षभ पंत नावाचे नाव देण्यात आले. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी कबूल केले की रोहित शर्मा, विराट...

तारीख बियाणे कॉफी म्हणजे काय आणि प्रत्येकजण अचानक त्यास का वेड लावतो

कॉफीच्या मजबूत कपबद्दल काहीतरी आहे जे फक्त योग्य वाटते. हे आपल्याला जागे होते, हलवते आणि त्या खोल, टोस्ट सुगंधात आपल्या इंद्रियांना लपेटते. आपल्यापैकी बर्‍याच...

error: Content is protected !!