दुचाकी वाहनासाठी नवीन मालिका सुरू
यवतमाळ, दि. 15 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ येथे परिवहनेत्तर विभागाकरीता वाहन ४.० प्रणाली सुरू करण्यात आली असून सद्या दुचाकी वाहन स्कुटर, मोपेड, मोटार सायकल यासाठी MH-29 CF-0001 TO 9999 ही मालिका सुरू करण्यात आली होती. ही मालिका दि. 15 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत असुन नवीन मालिका खालील प्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे.
MH-29-CG-0001 TO 9999 दुचाकी वाहन स्कुटर, मोपेड, मोटार सायकल या सर्व वाहनधारकांसाठी आहे. नमुद मालिकेतील आकर्षक क्रमांक उपलब्ध करण्यात आलेले आहे. तसेच आकर्षक क्रमांकाकरीता इच्छुक अर्जदारांनी विहीत नमुन्यात दि.16 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. या मालिकेमधिल नियमीत क्रमांक दि.17 ऑक्टोबर पासुन देणे सुरू होईल याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख यांनी कळविले आहे.