Homeक्राईमदुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात! पहा चोरटा आपल्या परिसरातील आहे का?

दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात! पहा चोरटा आपल्या परिसरातील आहे का?

दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात! पहा चोरटा आपल्या परिसरातील आहे का?

जवळा : एका अट्टल दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच त्याच्याकडून चोरीतील चार दुचाकींसह एकूण पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिसांनी गुरूवार, १७ ऑक्टोबरला दुपारी करण्यात आली.

आकाश चव्हाण रा. बजरंग चौक, जवळा असे चोरट्याचे नाव आहे. शहरात एका पाठोपाठ एक अशा दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. १७ ऑक्टोबरला दुपारी चोरटा आकाशने दुचाकी चोरीच्या काही घटनांना मूर्तरूप दिले असून तो आर्णी शहरात आला असल्याची गोपनीय माहिती

ठाणेदार सतिश चवरे यांना मिळाली होती. शिवाय एका दुचाकीची चोरी करतांना सिसिटिव्ही फुटेजमध्ये आढळून आला होता. त्यावरून चोरटा आकाश याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने दुचाकी चोरीच्या चार घटनांची कबूली दिली. शिवाय त्याच्याकडून चोरीतील दुचाकीही जप्त करण्यात आल्या.

काही दुचाकीचे स्पेअर पार्ट खोलून जवळा येथील ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स मधील बीएसएनएल ऑफिसमध्ये गाडीचे पार्ट ठेवण्यात आले होते.या कारवाईत पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमलू, जमादार रवी नेवारे, सुनील पैठणे, अंकुश फेंडर, राजकुमार कांबळे, सागर पथ्थे, आर्णी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक देशमुख, जवळा बीट अरुण चव्हाण, कर्मचारी ऋषीकेश इंगळे, नितीन वास्टर, अरविंद चिमटे आदिंनी सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एलएसजी स्टार डिजीवे रठी वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बीसीसीआयने निलंबित केले

अ‍ॅनिमेटेड चॅटमध्ये अभिषेक शर्मा आणि डिगेश रिती© बीसीसीआय/स्पोर्टझपिक लीगच्या वारंवार उल्लंघनासाठी लखनऊ सुपर गियाट्स स्पिनर डिग्व्ह रिती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलने एक...

Apple पल गंभीर सुरक्षा दोषांच्या निराकरणासह आयपॅडसाठी आयपॅडो 17.7.8 अद्यतनित करते

Apple पलने सोमवारी आयपॅडो 17.7.8 आयपॅडसाठी अद्यतनित केले. हे काही दिवसांपूर्वी सादर केले गेले होते परंतु आयपॅडो 17.7.7 फर्मवेअरचा पाठपुरावा म्हणून आला आहे परंतु...

error: Content is protected !!