दारव्हा तहसील अंतर्गत येत असलेल्या लोही येथे फटाक्याच्या दुकानाची चलबिचल
लोही येथे गावांमध्ये बसलेल्या ग्रामपंचायत समोर फटाक्याच्या दुकानाचे स्थान मांडल्या जात असते येथे कोणत्याही प्रकारचे अधिकृत लायसन्स किंवा नोंदणी प्रशासनाकडे नसते व असली तरी ते लोक वास्तव्यात नसते भाड्याने देऊन आपले नोंदणीचे पैसे गोळा करत असते यामध्ये कोण्याही नोंदणीकृत फटाक्याचे लायसन्स असलेले डेपो गावाबाहेर नाही व आपल्या घरामध्येच पूर्णतः वर्षभराचा साठा समाविष्ट करून ठेवत असते याकडे मात्र प्रशासन निर्बंध लावत नसल्याचे चित्र निर्माण होत आहे यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांचा चिरीमिरीचा काही सहभाग आहे का हे स्पष्टपणे दिसून येत आहे तलाठी व मंडल अधिकारी तहसीलदार दारव्हा यांना दारव्हा तालुक्यातील लोही बाजार हे गाव मुख्य बाजारपेठेचे गाव असल्याचे दिसून येत असून तरी का बरं लक्ष देत नाही आहेत हे गंभीर बाब संपूर्ण नागरिकाच्या लक्षात येत आहे एखांदी आकस्मित घटना घडली तर याला कोण जबाबदार हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह उद्भवत आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा एखाद्या दिवाळीच्या सणासुदी दिवशी कोणताही अनर्थ घडू शकते या बाबीवर ग्रामपंचायत लोही व तहसीलदार दारव्हा आणि मंडल अधिकारी व तलाठी यांनी कठोर भूमिका बजावणे गरजेचा आहे प्रशासनाने याकडे गंभीरतेने दुर्लक्ष केल्यास लोही ग्रामस्थ यांचे होणारे नुकसानास जबाबपात्र संबंधित अधिकारी व प्रशासन राहतील याकडे संपूर्ण ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांचे मत आहे प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन संबंधित फटाका व्यवसायावर निर्बंध लावणे गरजेचे आहे अशी मागणी ग्रामस्थांची आहे