जीशान ने केले आर्णी शहराचे नाव लौकिक
आर्णी प्रतिनिधी
पुसद येथे विभागीय स्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत आर्णीच्या मातीचा श्री. म. द. भारती शाळेचा विद्यार्थी जीशान रज्जाक शेख ने अव्वल क्रमांक पटवून आर्णी शहरात चे नाव लौकिक केली आहे.
कुस्ती म्हटलं की मराठवाड्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याचे नाव पुढे येतात परंतु
जीशान ने यवतमाळ जिल्ह्याचा नाव लौकिक केले असून त्याच्यासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत जीशान ने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्याची राज्यस्तरीय निवड झाली आहे त्यानिमित्त आर्णी येथे त्याचा सत्कार घेण्यात आला.
ह्या कार्यक्रमात ऍड. जावेद शेख, राष्ट्रवादीचे जिल्हा उपप्रमुख इनुस शेख, फारुख भाई धारीवाला, सामाजिक कार्यकर्ते सैय्यद रियाज भाई, शब्बीर खान, शेख मुस्तफाभाई अब्दुल शेख, शेख शमी, मौ. सुफी रिजवान तसेच आर्णी शहराच्या बरेच चाहत्यांनी
जीशान स्वागत केले.