Homeताज्या बातम्याजिल्हास्तरीय तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्यासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हास्तरीय तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्यासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हास्तरीय तक्रार समितीच्या अध्यक्ष व सदस्यासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि. 15  : कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगीक छळवणूकीस प्रतिबंध घालण्यासाठी अधिनियम अमलात आला आहे. या अधिनियमानुसार जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करावयाची आहे. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष व सदस्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.अधिनियमांतर्गत दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निवासी उपजिल्हाधिकारी यांना जिल्हा अधिकारी म्हणून घोषित केलेले आहे. ज्या कार्यालयामध्ये 10 पेक्षा कमी अधिकारी, कर्मचारी असतील किंवा जेथे विभाग प्रमुखाविरूध्द तक्रारी आहेत, अशा कार्यालयातील लैंगीक छळाच्या तक्रारी जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे करावयाच्या असतात. यापुर्वीच्या स्थानिक तक्रार समितीची कालमर्यादा संपुष्टात आली असल्याने सदर समितीचे पुर्नगठन केले जात आहे.या स्थानिक तक्रार समितीमध्ये अध्यक्ष व सदस्य यांची नियुक्ती करावयाची आहे. अध्यक्ष या पदाकरीता संबंधित महिलेचा सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असावा आणि सदर महिला महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेली असावी. महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशासकीय संघटना, संघ किंवा लैंगीक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यांमधून दोन सदस्य निवडण्यात येणार आहे. त्यांच्यापैकी किमान एक सदस्य महिला असावी. परंतु, त्यापैकी किमान एका सदस्याची पार्श्वभूमी प्राधान्याने कायद्याची असावी. यापैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.स्थानिक तक्रार समितीमधील अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीचा कालावधी 3 वर्षापेक्षा अधिक नसेल. वरील बाबींची पुर्तता करणारा परिपुर्ण प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन तळ मजला, जिल्हा परिषद कार्यालय परिसर येथे 7 दिवसाच्या आत साध्या ए 4 कागदावर सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विंग विझार्ड हॅरी मॅग्युअर युरोपा लीग फायनलमध्ये मँचेस्टर युनायटेड डिफेन्ससाठी प्रकरण बनवितो

सरप्रिस विंग विंग विझार्ड हॅरी मॅग्युअर म्हणतात की त्याला आशा आहे की तो टॉटेनहॅम द स्पर्धेविरुद्ध युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात मॅनचेस्टर युनायटेडच्या त्याच्या संरक्षणात्मक...

व्हेज लासॅग्ने, रिसोट्टो आणि बरेच काही: शनिवार व रविवारसाठी 7 इंटिजेन्ट व्हेज इटालियन पाककृती

दीर्घ आणि थकवणा week ्या आठवड्यानंतर, आम्हाला फक्त मधुर अन्नामध्ये खोदण्याची इच्छा आहे. आणि आपल्या मनःस्थितीत त्वरित उन्नती करणारी एक पाककृती इटालियन आहे. आपण...

error: Content is protected !!