Homeताज्या बातम्याजवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अर्ज आमंत्रित

यवतमाळ, दि. 15  : जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा तालुका घाटंजी येथे सी.बी.एस.ई. अभ्यासक्रम असलेल्या वर्ग 9 वी तील रिक्त जागांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता मागविण्यात येत आहेत.

विद्यालयात प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा ता. घाटंजी तसेच आवश्यकता असल्यास अन्य परीक्षा केंद्रावर होणार आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज https://cbseitms.nic.in/२०२४/nvsix व www.jnvyavatmal.com या वेबसाईट वर उपलब्ध आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर आहे. परीक्षेकरिता लागणारी विस्तारीत माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे.

विद्यार्थी शैक्षणिक सत्र 2024-2025 मध्ये इयत्ता 8 वी मध्ये शिकत असावा तसेच तो यवतमाळ जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेचाच विद्यार्थी असावा. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी इयत्ता 8 वी ची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, असे विद्यार्थी परीक्षेकरीता पात्र नाही.

ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता इयत्ता 9 वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालयात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरायचे आहे, त्या विद्यार्थ्यांचा रहिवासी जिल्हा आणि इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेला जिल्हा हा एकच असावा व तो त्याच जिल्ह्यात प्रवेश अर्ज करू शकतो.

विद्यार्थ्यांचा जन्म दि 1 मे 2021 ते 31 जुलै 2012 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. (दोन्ही दिवस धरून) ही अट सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागु आहे. अधिक माहितीसाठी https://cbseitms.nic.in/२०२४/nvsix व www.jnvyavatmal.com या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विंग विझार्ड हॅरी मॅग्युअर युरोपा लीग फायनलमध्ये मँचेस्टर युनायटेड डिफेन्ससाठी प्रकरण बनवितो

सरप्रिस विंग विंग विझार्ड हॅरी मॅग्युअर म्हणतात की त्याला आशा आहे की तो टॉटेनहॅम द स्पर्धेविरुद्ध युरोपा लीगच्या अंतिम सामन्यात मॅनचेस्टर युनायटेडच्या त्याच्या संरक्षणात्मक...

व्हेज लासॅग्ने, रिसोट्टो आणि बरेच काही: शनिवार व रविवारसाठी 7 इंटिजेन्ट व्हेज इटालियन पाककृती

दीर्घ आणि थकवणा week ्या आठवड्यानंतर, आम्हाला फक्त मधुर अन्नामध्ये खोदण्याची इच्छा आहे. आणि आपल्या मनःस्थितीत त्वरित उन्नती करणारी एक पाककृती इटालियन आहे. आपण...

error: Content is protected !!