*घरकुल मंजूर करून आणण्याकरिता नागरिकांकडून पाच हजाराची लाच !*
आकोली येथील प्रकरण ! नागरिकांची ओरड ! ]
*ढाणकी/ प्रतिनिधी :*
प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत आकोली या गावी घरकुल मंजूर करून आणून देतो म्हणून, ग्रामपंचायत च्या काही कर्मचारी पदाधिकाऱ्यांनी लाभार्थी नागरिकांकडून पाच पाच हजार रुपये जमा केल्याची चर्चा ; सध्या ढाणकी व परिसरात मोठ्या प्रमाणात रंगली आहे. यासाठी गोरगरीब गरजू नागरिकांनी अक्षरश: जवळचे दागिने मोडून पैसे दिले असल्याची माहिती आहे. परंतु अजूनही आकोली या गावचे एकही घरकुल मंजूर झाले नसल्याची सुद्धा चर्चा आहे. गरजू नागरिकांकडून जवळपास साडेसात लाखापर्यंतची रक्कम सुद्धा संबंधित लोकांनी जमा केल्याची चर्चा नागरिक करत आहेत. गेल्या सात महिन्यापासून ह्या घडामोडी घडत असून याबद्दल ग्रामसेवक यांना याची तीळ मात्र ही माहिती नसावी का ? वरिष्ठ अधिकारी सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का ?