- ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन .
महागाव तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाकरीता पगार सोडून बोनस १५ हजार व उर्वरीत पगार २५ टक्के, ५० टक्के, ७५ टक्के व महागाई भत्ता देण्यात यावा या मागणीसाठी गटविकास अधिकाऱ्यांना गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी निवेदन देण्यात आले.
गटविकास अधिकारी पंचायत समिती महागाव येथुन २६ ऑक्टोबर २०२३ रोजी दिवाळीला महागांव तालुक्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाकरीता बोनस रुपये १५ हजार ऑनलाईन पगार सोडुन उर्वरीत पगार २५ टक्के ५० टक्के, ७५ टक्के व महागाई भत्ता देण्यात यावा याबाबत पत्र काढण्यात आले होते परंतु तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत कडून सदर आदेशित पत्राबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही व कोणत्याही ग्रामपंचायत कडून तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाकरीता बोनस रु.१५ हजार व ऑनलाईन सोडुन उर्वरीत पगार २५ टक्के ५० टक्के, ७५ टक्के व महागाई भत्ता मिळाला नाही. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे दि.०८ एप्रिल २०२२ चे पत्रा नुसार ग्रामपंचायत कर्मचान्यांना किमान वेतन अधिनियम १९४८ अंतर्गत राहणीमान भत्ता थकीत व चालू रकमेसह देण्यात यावा असे स्पष्ट आदेश आहेत परंतु तरी सुद्धा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कडून राहणीमान भत्ता देण्यास टाळाटाळ केली जाते. त्याबाबत आपले कार्यालयाकडून सर्व ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत कर्मचारी यांना चकीत व चालू रकमेसह राहणीमान भत्ता देण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते परंतु ग्रामपंचायत स्तरावर त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही व तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांना थकीत व चालू इकमेसह राहणीमान भत्ता मिळाला नाही. त्यामुळं आपलं स्तरावरुन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना कार्यवाही करण्या बाबत आदेशित करण्यात यावे दिवाळी बोनस सह महागाई भत्ता तत्काळ देण्यात यावा यासह आदी मागण्यांचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले या वेळी अध्यक्ष स्वप्निल बेलखेडे, उपाध्यक्ष सुदेश नरवाडे, कार्याध्यक्ष अवधूत पुंडे, सचिव सुभाष सेवाकर, यांच्यासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.