- गोठ्यातील पाळीव प्राण्यावर वाघाचा हल्ला .
राहुल शेत शिवारात वाघाची दहशत शेतकरी त्रस्त !
महागाव तालुक्यातील राहुर शेतशिवारामध्ये शनिवारी मध्यरात्री गोठ्यात बांधून असलेल्या कालवडीला वाघाने ठार केले आहे
दोन दिवसाच्या गाईच्या बछाड्यास वाघाने जखमी केले
या गोठ्याला लागूनच हाकेच्या अंतरावर असलेल्या पैनगंगा गोरक्षण मधील गोठ्यात बांधून असलेल्या दुसऱ्या गाईला सुद्धा या वाघाने ठार केले आहे राहुर येथील शेतकरी गजानन निळकंठराव काळे यानी नेहमीप्रमाणे आपली जनावरे गोठ्यात बांधून गेले असता रात्रीच्या सुमारास या वाघाने एका कालवडीचा फडसा पडला व एक दोन दिवशीय गाईच्या बछड्याला जखमी केले
व तसेच पैनगंगा गोरक्षण संस्थेमधील एका गाईला ठार मारले वाघाच्या मुक्त संचारामुळे राहुर शिरपुली परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे वनरक्षक ढूमाळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन जनावरांची पाहणी केली आहे तरी वन विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.