Homeक्राईमखोटे सोने विकणाऱ्या टोळीतील तिसरा आरोपी अटक, ७० हजार रुपये जप्त*

खोटे सोने विकणाऱ्या टोळीतील तिसरा आरोपी अटक, ७० हजार रुपये जप्त*

*खोटे सोने विकणाऱ्या टोळीतील तिसरा आरोपी अटक, ७० हजार रुपये जप्त*

आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार

आर्णी खोट्या सोन्याच्या व्यवहाराच्या नावाखाली १० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिसऱ्या आरोपीला आर्णी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील ७० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.

फिर्यादी महेश रामेश्वर हाके (वय २०, रा. शिरनाळ, ता. चाकूर, जि. लातूर) यांना आरोपी दिनेश चव्हाण यांनी आमिष दाखवले की, त्याच्या वडिलांना खोदकाम करताना एक किलो सोन्याची नाणी मिळाली आहेत. ती विकण्यासाठी मदत करा किंवा स्वतः खरेदी करा. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने १० लाख रुपयांत नाणी खरेदी करण्याची तयारी दर्शवली.दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी १० लाख रुपये घेऊन आर्णी येथे आरोपींना भेटायला गेले. पैसे देताच, अचानक झायलो गाडीमधून तोतया पोलिसांनी येऊन फिर्यादीला धमकावले आणि आरोपी रोख १० लाख रुपये घेऊन पसार झाले. याप्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात कलम ३१८(४), २०५, ३ (५) भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

यापूर्वी या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी अंकुश उर्फ पंकज बाबूसिंग राठोड (वय ३४, रा. पिंपळगाव पारध, ता. पुसद) आपल्या गावी असल्याचे समजले. त्यानुसार, पोलीस पथकाने शोध घेऊन दिनांक २८ मार्च २०२५ रोजी त्याला अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यातील हिस्स्यापैकी ७० हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियूष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चिलुमुला रजनिकांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील नाईक, सपोनि प्रशांत देशमुख, पोहवा मनोज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल आकाश गावंडे व आकाश पातूरकर यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.आर्णी पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी तपासामुळे या फसवणूक प्रकरणातील आणखी एक आरोपी गजाआड झाला असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

या साध्या आयुर्वेदिक पाचक मिक्ससह नैसर्गिकरित्या आंबटपणा कसा बरे करावा

आजच्या वेगवान-वेगवान जगात, आपली पाचक प्रणाली बर्‍याचदा आपल्या जीवनशैलीच्या निवडींचा, शांतपणे परंतु व्यक्तीचा त्रास सहन करते. बॅक-टू-बॅक मीटिंग्ज, वगळलेले ब्रेकफास्ट, रात्री उशिरा स्नॅकिंग आणि...

एलएसजी स्टार डिजीवे रठी वारंवार आचारसंहितेच्या उल्लंघनासाठी बीसीसीआयने निलंबित केले

अ‍ॅनिमेटेड चॅटमध्ये अभिषेक शर्मा आणि डिगेश रिती© बीसीसीआय/स्पोर्टझपिक लीगच्या वारंवार उल्लंघनासाठी लखनऊ सुपर गियाट्स स्पिनर डिग्व्ह रिती यांना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) गव्हर्निंग कौन्सिलने एक...

Apple पल गंभीर सुरक्षा दोषांच्या निराकरणासह आयपॅडसाठी आयपॅडो 17.7.8 अद्यतनित करते

Apple पलने सोमवारी आयपॅडो 17.7.8 आयपॅडसाठी अद्यतनित केले. हे काही दिवसांपूर्वी सादर केले गेले होते परंतु आयपॅडो 17.7.7 फर्मवेअरचा पाठपुरावा म्हणून आला आहे परंतु...

error: Content is protected !!