उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची जाहीर सभा .
राजू नजरधने यांच्या प्रचारार्थ .
गणेश एकंडवार
उमरखेड विधानसभा मतदार संघात राजकीय मैदान चांगलेच तापले . यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत चांगली चुरस निर्माण केली.आता त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याची आज उमरखेड मध्ये प्रचार सभा असल्याने ते काय बोलणार याकडे विधानसभेतील मतदारांचे लक्ष लागले आहे.
गणेश एकंडवार
भाजपतील अंतर्गत कलहामुळे माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचा एनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली.त्यामुळे बंडा पेक्षा झेंड्यावर निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेत अवघ्या तासाभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून मनसेचे इंजिन हाती घेतले.अभी नहीं तो कभी नहीं ही कार्यकर्त्यांची जनभावना असल्याने ते आता विधानसभेच्या निवडणूक प्रचारात जोरदार कामाला लागले.त्यांनी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात प्रचार सुरू केला असून त्यामध्ये आघाडी मिळवली आहे.जनतेकडून मिळणारी सहानुभूती चर्चेला जात असताना विधासंभेतील लढतीत चुरस निर्माण झाली आहे.या लढतीत बळ देण्यासाठी दस्तुरखुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज उमरखेड येथे प्रचार सभा घेणार आहेत.त्यांच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण विधासंभेचे लक्ष लागले आहे.