*आर्णी केळापूर मतदार संघामध्ये सात उमेदवारांनी उमेदवारी घेतली मागे.*
# 14 उमेदवारांमध्ये होणार चुरशीची लढत
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभा मतदारसंघ अनु. जमाती साठी राखीव आहे. काही दिवसा अगोदर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यासाठी २८ उमेदवारानी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी ७ उमेदवाराचे अर्ज अवैद्य करण्यात आले होते. नंतर २१ उमेदवाराचे अर्ज वैद्य ठरले होते.आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दी. 4/11/2024 हा शेवटचा दिवस होता.
आज शेवटच्या दिवशी एकूण उमेदवारांपैकी सात उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले.
त्यामुळे १४ उमेदवारामधे चुरशीची लढत होईल असे चित्र स्पष्ट झाले.
उमेदवारी अर्ज मागे घेनाऱ्यामधे
१) नितीन रामचंद्र मडावी
२)आडे रोशना यूवराज
३)नयना शैलेश ठाकूर
४)राहुल सुभाष सोयाम
५)विठ्ठल किसनराव मरापे
६)नामदेव फकरु सोयाम
७)विष्णु शंकरराव उकंडे
याची नावे आहेत.