Homeताज्या बातम्याआचारसंहितेदरम्यान उत्पादन शुल्ककडून 21.89 लाखाचे अवैध मद्य जप्त

आचारसंहितेदरम्यान उत्पादन शुल्ककडून 21.89 लाखाचे अवैध मद्य जप्त

आचारसंहितेदरम्यान उत्पादन शुल्ककडून 21.89 लाखाचे अवैध मद्य जप्त

यवतमाळ, दि.8 : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्यविक्रीवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत 21 लाख 89 हजाराचे अवैध मद्य जप्त करण्यात आले आहे.

जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दि. 5 व 6 नोव्हेंबर या दरम्यान झोटींगधारा नाला परिसर मोहदा ता. केळापुर, रोशन धाबा शिंदोळा ता. वणी, मांडवा गावाचे शिवार, नाल्याकाठी ता.झारी जामणी, शास्त्री नगर, वणी, माऊली धाबा मौजा हरसुल ता. दिग्रस, हरु ता. दारव्हा, मौजा मंगरुळ शिवार ता. यवतमाळ, किन्ही ता.जि. यवतमाळ व इतर गावामध्ये एकूण 23 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत 23 वारस गुन्ह्यांसह 25 आरोपीसह 5 वाहनांसह देशी मद्य 133 लिटर, हातभट्टी 610 लिटर, विदेशी मद्य 4 लिटर व सडवा 7 हजार 200 लिटर असा एकुण 7 लाख 74 हजार 205 रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरु आहे. निवडणुक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असुन अवैध दारु विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क कार्यालयांतर्गत दि.15 ऑक्टोबर ते दि.6 नोव्हेंबर या कालावधीत एकुण 127 गुन्हे नोंदवून 126 वारस गुन्ह्यासह 129 आरोपीसह 10 वाहनांसह देशी मद्य 383 लिटर, हातभट्टी 2 हजार 552 लिटर, विदेशी मद्य 14.2 लिटर, ताडी 445 लिटर व सडवा 27 हजार 275 लिटर असा एकून 21 लाख 89 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईमध्ये, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितेश भाऊराव शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एन. सेंगर, पी.एस. बेढारे, जी. एस. वाघ, साहेबराव बोदमवाड यांच्यासह सर्व दुयम्म निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

निवडणूक आचारसंहिता कालावधीमध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतुक, विक्री यावर नियंत्रण ठेवण्याकरीता 7 पथके तयार करण्यात आलेली असून अवैध मद्य विक्री करणाऱ्यावर कार्यवाही करण्यात येत आहे. अवैध मद्य विक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास टोल फ्री नंबर १८००८३३३३३ किंवा व्हॉट्सऍप नंबर ८४२२००११३३ किंवा उत्पादन शुल्क कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 07232- 244256 यावर माहिती कळवावी, असे अधीक्षक नितेश शेंडे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सॅमसंग स्मार्ट मॉनिटर एम 9 रिफ्रेशेड एम 8, एम 7 मॉडेल्ससह भारतात क्यूडी-ओलेड डिस्प्लेसह...

सॅमसंगने भारतात एम 9 स्मार्ट मॉनिटर सुरू केला आहे. मॉनिटरमध्ये क्यूडी-एलईडी पॅनेलची वैशिष्ट्ये आहेत जी 4 के रेझोल्यूशन, 165 हर्ट्झ रीफ्रेश रेट आणि 0.03ms...

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राने 16 जीबी रॅम, सुधारित टेलिफोटो लेन्स, अधिक मिळविण्यास सांगितले

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचे अनावरण पुढील वर्षी गॅलेक्सी एस 26 आणि गॅलेक्सी एस 26+ स्मार्टफोनसह पुढील वर्षी केले जाण्याची शक्यता आहे. संभाव्य प्रक्षेपणपूर्वी,...

ध्वनी कळी एफ 1 पुनरावलोकन: रु. 1,200?

आवाजाच्या कळ्या एफ 1 ने मे महिन्यात देशांतर्गत बाजाराला धडक दिली. हे बजेट टीडब्ल्यूएस इयरफोन भारतात डिझाइन केल्याचा दावा केला जात आहे. त्यात 11...

error: Content is protected !!