अब राजा का बेटा राजा नहीं बनेंगा वहीं बनेगा जो काबिल होगा !
आर्णी: विधानसभा ची निवडणूक जाहीर होताच आर्णी केळापूर येथील राजकारण ढवळून निघाले आहे. या निमित्ताने ‘राजा का बेटा, राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो काबील होगा’ अशी चर्चा मतदारसंघात जनता करतांना दिसत आहे.
या निवडणुकीसाठी कॉग्रेस व भाजप या प्रमुख पक्षाकडे एकापेक्षा जास्त ईच्छुकांची संख्या होती. त्यामुळे आपुसकच नामांकन अर्ज भरतांना महाविकास आघाडी तथा महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याचे पहावयास मिळाले. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या अंतीम दिवशी पर्यत आघाडी व युतीच्या नेत्यांना किती
बंडखोरांना थांबविण्यास यश मिळेल त्यावरच कॉग्रेस व भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित लागणार आहे.